Ranveer singh | अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या बहुचर्चित ‘कांतारा चाप्टर १’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे आणि कथेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. मात्र एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा चाप्टर १’ चित्रपटावर टीका केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. इतकेच काय तर रणवीरने त्याचा ‘भूत’ म्हणूनही उल्लेख केला होता. यावर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर रणवीर सिंहने जाहीररित्या चाहत्यांची माफी मागितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणवीरने लिहिलं की, “मला ऋषभ शेट्टीच्या जबरदस्त अभिनयाला हायलाईट करायचं होतं. त्याने ज्यापद्धतीने हा सीन साद केला आहे. त्यासाठी त्याने किती मेहनत घेतली आहे, याचा मला अंदाज आहे. त्यामुळे मला त्याचं कौतुकच आहे. मी नेहमीच आपला देश, संस्कृती, परंपरा आणि विश्वास या गोष्टींचा खूप सन्मान करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून मी माफी मागतो.” रणवीर सिंहची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ranveer singh | कशामुळे निर्माण झाला वाद? रणवीर सिंहने इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटावर भाष्य केलं आहे. यावेळी रणवीर सिंह म्हणतो की, “ऋषभ शेट्टी मी तुझा सिनेमा थिएटरमध्ये बघितला, तुझा अभिनयही कमाल होता. खासकरून जेव्हा तुझ्या अंगात फीमेल भूत येतं तो शॉट तर खूपच भारी होता.” यावेळी रणवीर सिंह ‘कांतारा‘ चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या चामुंडा मातेच्या प्रवेशाचा एक सीन भर कार्यक्रमात करुन दाखवतो.अत्यंत विचित्र पद्धतीने रणवीरने सर्वांसमोर त्या प्रसंगाची नक्कल केली होती. यावरून ऋषभ शेट्टीलाही हसू अनावर होते. मात्र रणवीरने देवाचा अपमान करत हिंदु भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. Ranveer singh | हेही वाचा: पाकिस्तानात मोठा गोंधळ! खैबर पख्तूनख्वामध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी ; इम्रान खानचे हजारो समर्थक एकवटले