APP vs BJP : केजरीवालांच्या ‘त्या’ अजब मागणीवर भाजपचा पलटवार, म्हटलं…”हिंदुत्वाचे…”

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती आणि लक्ष्मीचाही फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
यावर भाजपने केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळू नये, असे भाजपने म्हटले आहे. त्यांना भक्त बनण्याची गरज नाही. ते फक्त मतांसाठी धर्माचा आव आणत आहेत. अस म्हणत, भाजप खासदार मनोज तिवारी आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, दिवाळी साजरी केली तर तुरुंगात टाकण्याची धमकी देणारे लोक आज कसा यू-टर्न घेत आहेत. हे संपूर्ण देश पाहत आहे. ते म्हणाले की, जे केजरीवाल काही दिवसांपूर्वी तुम्ही चुकूनही दिवाळी साजरी केली तरी तुम्हाला तुरुंगात टाकू, असे म्हणत होते, ते आज अचानक लक्ष्मीजी आणि गणेशजींबद्दल बोलत आहेत, हे सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलले जात असल्याचे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
यावर भाजप नेते मनोज तिवारी (BJP leader Manoj Tiwari) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. केजरीवाल यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांनी मतांसाठी धर्माचा आव आणत असल्याचं म्हटलंय.
दुसरीकडे भाजप नेते मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार प्रहार करत केजरीवाल यांच्या वक्तव्याला हास्यास्पद म्हटले आहे. ते म्हणाले की, केजरीवाल मतांसाठी धर्माचा आव आणत आहेत तसेच त्यांना भाजप नेत्याने दिल्ली आणि पंजाबमधील जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.





