चलो मुंबई.. आमरण उपोषण ! मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी एल्गार ‘या’ तारखेला धडकणार मुंबईत

Maratha Reservation राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. त्यापूर्वी आज 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करण्यात आली आहे.यावेळी जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यासह सरकारला थेट इशारा दिला.
जो आपल्या बाजूने तोच आपला नेता.. प्रश्न मार्गी लावा बाकीची नाटक कशाला ? असा सवाल जरांगे यांनी सरकारला केला. शांततेचं आंदोलन करायचं.. शांततेत खूप ताकद आहे.आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं जरांगे यावेळी म्हणाले.
सरकारला तीन चार वेळा वेळ वाढवून दिला. तारखा देखील बदलल्या. आता आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का ? तारीख ठरवायची का ? पुन्हा एकदा विचारतोय असं म्हणत सभेतच जरांगेनी कौल घेतला त्यावेळी सभेतून हो म्हणून उत्तर आलं. त्यावर चलो मुंबई असं म्हणत २० जानेवारी मुंबईला आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जराजे यांनी जाहीर केलं. आझाद मैदानावर २० जानेवारीला आमरण उपोषण करणार सर्व मराठा समाजाने साथ द्या असं जरांगे यांनी जाहीर केलं.
मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे
मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे.
देव जरी आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणार
देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, आपण तेच घेणार असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांनी यांनी मोठं करायचं आणि मराठ्यांचे मुडदे पडत असताना यांनी त्याकडे पाहायचं नाही,




