जालना : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या यश मिळवले तर मविआ मोठा फटका बसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. काय म्हणाले मनोज जरांगे ? मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला निवडून आणायचं ज्याला पाडायचं त्याला पाडा. आमच्या मागन्या मान्य करायच्या नाहीतर सामूहिक उपोषण होणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचं नाही. राज्यात अर्धी गावं आमची आहेत. तुमच्या मागणी मान्य करायच्या, आमच्याशी बेईमानी करायची नाही. मराठ्यांना खेळवायचे आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा नाही. एका जातीवर उमेदवार उभे करून मला माझी जात संपवायची नव्हती. गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतला असेल. माज मस्ती आली मराठ्यांशी बेईमानी केली तर पुन्हा आमरण उपोषण होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. फडणवीसांना दिला इशारा राज्यात मराठ्यांचा नाद करू नये, मराठ्यांनी शेवटी 204 आणले. सरकार स्थापन झाले की, आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही. तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, असा इशाराच मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला आहे.