मुंबई : नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमत दिले तर महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले. त्यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार येणार हे मात्र निश्चित. तर दुसरीकडे मराठा आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आंदोलनाला बसणार असा इशारा दिला होता. त्यानंतर आज लक्ष्मण हाकेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेवर जोरदार निशाण साधला आहे. यावेळी लक्ष्मण हाकेंनी जरांगेना चांगलेच फैलावर घेतले. काय म्हणाले लक्ष्मण हाके? जरांगे लबाड आणि खोटारडा माणूस आहे. अजूनही तो मराठा समाजाच्या तरूणांची माथी भडकवण्याची काम करतोय, अशी टीका हाकेंनी केली. ‘महाराष्ट्रातल्या जनतेनं तुझा पार पातोरं केलंय तुझं पार थोबाड फोडलंय तरीही वर तोंड करून बोलतोय. तुझं नाक गेलं तरी XXX उरलं, असं तुझं झालंय. होय, ओबीसींच्या प्रश्नासाठी मी महायुतीला जाहीर पाठिंबा दिली जाहिर भूमिका घेतली. होय, आमच्या भूमिकेमुळे ओबीसींचे 30-32 आमदार निवडून आले असे लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच मराठा समाजाचे 205 आमदार निवडून आले, हे जरांगेंचं विधान खोटं आहे. त्याने आकडेवारी तपासावी. मग बोलावं. होय, शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांचा आमच्यामुळे पराभव झाला आहे असेदेखील लक्ष्मण हाके म्हणाले.