मुंबई : मराठा आंदोलक नोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तसेच वाल्मिक कराडसंदर्भात एक मोठी मागणी केली. काय म्हणाले मनोज जरांगे? वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. त्याला काहीही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून अधिकारी पाठवले जात आहेत. षडयंत्र सुरू आहे, दवाखान्यात नेऊन सोडण्याचं ऑपरेशन सुरू आहे. आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढावेत, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला चादरी नेऊन दिल्या. त्यांचीही चौकशी करा. सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. सगळ्यांकडे भरपूर माहिती आहे, या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. कराड याचं दुखत नसताना देखील त्याचे डॉक्टर त्याचं दुखत असल्याचं सांगत आहेत. त्यांची चौकशी करा, त्याच दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं आहे? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीसांनी हे षडयंत्र केलं आहे का? असा सवालदेखील जरांगे पाटील यांनी केला आहे.