Manoj Jarange On Chhagan Bhujbal| – निवडणुकीला उभे राहून स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आता राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही पाडणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. जरांगे काल मंगळवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
ओबीसीमध्ये आमच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटं बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार, असा इशाराही मनोज जरांगेंनी भुजबळांना दिला आहे. । Manoj Jarange On Chhagan Bhujbal
यावेळी मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सर्व जण सारखेच आहेत. तिघांनी मिळून षड्यंत्र केले. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा, असे जरांगेंनी म्हंटले आहे. । Manoj Jarange On Chhagan Bhujbal
पाडण्यात सुद्धा विजय-
जरांगेंनी यावेळी मराठा समाज बांधवांना निवडणुकीला उभे राहण्यापेक्षा पाडण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मराठ्यांनो निवडणुकीला उभे राहण्यापेक्षा त्यांना पाडा.
त्यांना पाडण्यात सुद्धा विजय आहे, मला समाजाव्यतिरिक्त इतर काहीही कळत नाही. 6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर विधानसभेला उमेदवार देणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हेही वाचा:
२१-१७-१० महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला ! वाचा कोण कोठे लढणार?