Manisha Koirala : तो फोटो शेअर करत मनीषा कोईरालाची पोस्ट; नेपाळमधील हिंसाचाराच्या घटनेबाबत व्यक्त केले दु:ख

Manisha Koirala : भारताशेजारी देश नेपाळला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आणलेली बंदी. या कारणामुळे तिथे जोरदार आंदोलन सुरू आहे. या निर्णयाला विरोध करत तेथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
आतापर्यंत या आंदोलनात अनेकांनी प्राण गमावलेले आहेत. अशातच आता बॅालिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रक्ताने माखलेल्या पांढरा बुट दिसत आहे. हा फक्त एक फोटो नसून नेपाळमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा पुरावा आहे, जो खूपच भयानक दिसत आहे.
View this post on Instagram
मनीषा कोईरालाने या पोस्टसोबत एक व्यंग्यात्मक कॅप्शन दिले आहे. नेपाळी भाषेत लिहिले आहे की, ‘आज नेपाळसाठी तो दिवस आह, जेव्हा लोकांचा आवाज, भ्रष्टाचाराविरुद्धचा राग आणि न्यायाच्या आवाहनांना गोळ्यांनी उत्तर दिले जाते. याचा अर्थ असा की आज नेपाळसाठी काळा दिवस आहे, जेव्हा लोकांच्या आवाजाला भ्रष्टाचाराविरुद्धच्या त्यांच्या रागाला आणि न्यायाच्या मागणीला गोळ्यांनी उत्तर देण्यात आले.
नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर बंदी घातल्यामुळे हे आंदोलन नेपाळमध्ये होत असून ते आता आणखी चिघळले आहे. तथापि, सुरक्षेचे कारण देत सरकारने हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं आहे. मात्र, तेथील नागरिकांकडून रस्त्यावर उतरून मोठा निषेध व्यक्त केला जात आहे.
हिंसाचारानंतर स्थानिक प्रशासनाने नेपाळच्या राजधानीच्या अनेक भागात कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडू व्यतिरिक्त, ललितपूर जिल्हा, सुनसराय जिल्ह्यातील पोखरा, बुटवल आणि इटहारी येथेही कर्फ्यूचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हेही वाचा : “हे काय विचारताय, मी आता रोज..” ; मतदानापूर्वी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी का चिडले ?





