काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट ; म्हणाले,”मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकत्र…”

Manish Tewari meets Prime Minister । ऑपरेशन सिंदूर अंतर्गत वेगवेगळ्या देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश केल्यानंतर परतलेल्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलण्यासाठी परदेशात गेलेले सर्व विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. मनीष तिवारी आणि शशी थरूर सारखे काँग्रेस खासदारही या शिष्टमंडळाचा भाग होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू जोरदारपणे मांडली. या बैठकीनंतर मनीष तिवारी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे ही लोकशाहीची ताकद Manish Tewari meets Prime Minister ।
या बैठकीबद्दल मनीष तिवारी यांनी सोशल मीडियावर,”कोणत्याही महान लोकशाहीची खरी ताकद ही असते की ती मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकत्र काम करू शकते. वैचारिक, राजकीय आणि वैयक्तिक मतभेद असूनही, राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे हे लोकशाही परिपक्वतेचे लक्षण आहे. आजच्या संध्याकाळची ही खास गोष्ट होती.” लिहिले.
मनीष तिवारी यांनी पुढे, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची आणि विविध देशांचे अनुभव शेअर करण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची ही एक आनंददायी संधी होती, विशेषतः जेव्हा देश कठीण काळातून जात आहे.”असे म्हटले.
The true strength of any great Democracy is the ability to work across the aisle.
To surmount our differences ideological , conceptual, political and personal and put larger National interest above the cut and thrust of partisan politics.
….And that is what this evening was… pic.twitter.com/lBwHdcGdMW
— Manish Tewari (@ManishTewari) June 10, 2025
राहुल गांधींच्या विधानांवरही प्रतिक्रिया दिली Manish Tewari meets Prime Minister ।
या शिष्टमंडळाचा भाग असलेले काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनीही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. एएनआयला दिलेल्या निवेदनात ते म्हणाले, “मी आधीही म्हटले आहे की आपल्या भारतीय लोकशाहीची ताकद तिच्या विविधतेत आणि वेगवेगळ्या विचारांच्या स्वातंत्र्यात आहे. हेच भारताला पाकिस्तान आणि अनेक हुकूमशाही देशांपेक्षा वेगळे बनवते.”
मनीष तिवारी म्हणाले, “लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार असणे ही कमकुवतपणा नसून ताकद आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु, मी हे स्पष्ट करतो की या मोहिमेचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला उघड करणे हा होता आणि या कामासाठी परदेशात गेलेल्या संघांनी या विचारसरणीचे बीज पेरले आहे.”





