Manipur News : मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; 4 जणांचा मृत्यू
मणिपूरमध्ये (Manipur News) सशस्त्र दहशतवाद्यांनी एका वाहनाला लक्ष्य करत हल्ला चढवला. त्यामध्ये संबंधित वाहनातून प्रवास करणारे चौघे मृत्युमुखी पडले.

Manipur News : मणिपूरमध्ये (Manipur News) सशस्त्र दहशतवाद्यांनी एका वाहनाला लक्ष्य करत हल्ला चढवला. त्यामध्ये संबंधित वाहनातून प्रवास करणारे चौघे मृत्युमुखी पडले. तर, एक जण जखमी झाला. मृत व्यक्ती नागा समुदायाचे सदस्य असल्याचे समजते.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याची घटना कंगपोकपी जिल्ह्यातील दुर्गम भागात घडली. त्या जिल्ह्यात कुकी समुदायाची लोकसंख्या अधिक आहे.हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले (Manipur News) नागरिक सेनापती जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यामुळे संबंधित घटनेचे पडसाद सेनापती जिल्ह्यात उमटले.
नागा पीपल्स ऑर्गनायझेशनने निदर्शने करत दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यास भाग पाडले. दहशतवादी हल्ल्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन मणिपूरचे मुख्यमंत्री वाय.खेमचंद सिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेतली.
त्यांनी हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई (Manipur News) करण्याचे आदेश सुरक्षा आणि तपास यंत्रणांना दिले. अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांवरील कारवाईचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. सिंह यांनी १२ ऑगस्टला अवैध शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आवाहन मणिपूरमधील जनतेला केले. त्यासाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव निर्माण होऊ नये यासाठी संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली.






