Manipur News : मणिपूरमध्ये (Manipur News) शटडाउन सुरू असताना रविवारी रात्री अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. इंफाळ पूर्वमधील कोइरेंगेई, इंफाळ पश्चिममधील उरिपोक आणि काकचिंग जिल्ह्यात मशाल रॅली करण्यात आली. काकचिंगमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. गर्दी पांगवण्यासाठी (Manipur News) सुरक्षा दलांनी अश्रुधूर, स्मोक बॉम्ब आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. निदर्शकांनी दगडफेक केली. या चकमकीत अनेक जण जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी ट्रोंगलाओबी आवांग लेइकाई येथील एका घरावर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला होता. यांच्या न्यायासाठी निदर्शने सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली. Manipur News इंफाळ पश्चिमचे एसपी शिवकांत सिंह म्हणाले की, अलीकडील निदर्शनांमध्ये काही समाजकंटक रॅलींचा फायदा घेऊन सुरक्षा दलांवर हल्ला करत आहेत. त्यांनी सांगितले की, हल्ल्यांमध्ये लोखंडी वस्तू, गोफण, दगड आणि पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. अनेक लोक नशेतही आढळले. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी १८ एप्रिल रोजी पातसोई ते सगोलबंद दरम्यान (Manipur News) इम्फाल-जिरीबाम रोडवर काढण्यात आलेल्या मशाल रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात २१ जणांना अटक केली आहे. रॅलीदरम्यान जमावाने दगडफेक, पेट्रोल बॉम्ब आणि गोफणीचा वापर केला, ज्यामुळे अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. सीआरपीएफच्या २३२ व्या बटालियनचे तीन जवान गंभीर जखमी झाले, तर सरकारी वाहनांचेही नुकसान झाले. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये सगोलबंद, तेरा, उरिपोक, ब्रह्मापूर, लांगथाबल, नगामापाल, नाओरेमथोंग आणि थांगमेइबंदसह इम्फालमधील अनेक भागांतील रहिवाशांचा समावेश आहे. मेइरा पैबी संघटनेने हल्ल्यातील आरोपींना २५ एप्रिलपर्यंत अटक करण्याची मागणी केली आहे. घाटीतील जिल्ह्यांमध्ये आधीच ५ दिवसांचे संपूर्ण शटडाउन सुरू आहे. तर, नागाबहुल भागांमध्ये स्वतंत्रपणे ३ दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. बाजार बंद झाल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.