WTT contenders Lasco : टेबल टेनिसपटू मनिका-अर्चनाला सुवर्ण
Updated On:

नवी दिल्ली – भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि अर्चना कामत या जोडीने डब्ल्यूटीटी कंटेन्डर लास्को टेबल टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले.
मनिका व अर्चना जोडीने अंतिम फेरीत क्युबाच्या मेलानी आणि एड्रियाना या डियाज भगिनींचा 3-0 (11-3, 11-8, 12-10) अशी मात केली.
भारताने या स्पर्धेत एकूण तीन पदके पटकावली आहेत. महिला एकेरीत मनिकाने ब्रॉंझ, तर मिश्र दुहेरीत अर्चनाने मानव ठक्करच्या साथीने ब्रॉंझपदक मिळवले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मनिकाला चीनच्या वॅंग यिडीकडून 2-4 (7-11, 11-7, 11-13, 12-10, 7-11, 5-11) असा पराभव पत्करावा लागला.





