Deenanath Mangeshkar Award 2025 : यावर्षीचा प्रतिष्ठित ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी आणि अनेक कलाकारांनाही या वर्षी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्यातील दिग्गजांना दिला जातो, आणि लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. मंगेशकर कुटुंबाने परिपत्रकाद्वारे ही घोषणा केली. दरम्यान, यंदाचा दीनानाथ मंगेशकर जयंती म्हणजेच दि. 24 एप्रिल रोजी पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कार दिला जाईल. सन 2022 मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे. तर यंदाचा हा पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी यंदा पत्रकार परिषद न घेता परिपत्रकाच्या माध्यमातून घोषणा केली. कोणाला मिळणार पुरस्कार पाहा यादी : अभिनेत्री श्रद्धा कपूर वायोलिनिस्ट एन.राजम ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेता शरद पोंक्षे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गायिका रीवा राठोड