नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. मायावती या लोकसभा उमेदवारीचे तिकीट विकतात असा आरोप मनेका गांधी यांनी केला. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी भाजपाच्या उमेदवार आहेत. सुलतानपूर येथे आयोजित केलेल्या सभेत बोलताना मनेका गांधी यांनी हा आरोप केला.
मनेका गांधी म्हणाल्या की, ‘बसपा नेत्या मायावती उमेदवारीचे तिकीट विकतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या पक्षाने नेते अभिमानाने हे सांगतात. मायावती यांची बरीच घरे आहेत असे मायावती यांच्या पक्षाचे नेतेच सांगतात. बसपामध्ये कोणालाही तिकीट मोफत दिले जात नाही. मग सपा-बसपा आघाडीचे उमेदवार चंद्रभद्र सिंह यांच्याकडे हे पैसे आले कुठून’? असा सवाल मनेका गांधी यांनी उपस्थितांना केला. तसेच हे 15 करोड दिल्याची टीकाही मनेका गांधी यांनी सिंह यांच्यावर केली.