मांडवगण फराटा -साप चावल्याने मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे एका 13 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता घडली. आदेश भुपेंद्र कुंभार (वय 13 रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
तर याप्रकरणी भूपेंद्र नरेश कुंभार (वय 39 रा. मांडवगण फराटा) यांनी मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्र येथे खबर दिली आहे. दरम्यान, उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.