प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून शहराचा कायापालट केला जाईल, अशी ग्वाही शिवसेना नेते व उद्योजक रमेश येवले यांनी दिली.मंचरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा राजश्री दत्ता गांजाळे यांनी समर्थकांसह पदग्रहण केल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात शिवसेना नेते रमेश येवले बोलत होते. यावेळी उद्योजक रमेश येवले यांच्या हस्ते नगराध्यक्ष राजश्री दत्ता गांजाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक विकास जाधव, लखन पारधी,अंजली बाणखेले,अंशरा शेख यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. मंचर शहर अधिक सुंदर, सुव्यवस्थित व विकासाभिमुख करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शरद सोनवणे यांची मोलाची साथ घेतली जाईल, असे येवले यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा राजश्री दत्ता गांजाळे यांनी मंचरच्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, तसेच पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांवर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून मंचर शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वासही येवले यांनी यावेळी व्यक्त केला.