बोरखेडी पिनगाळे येथील पूल खचल्याने शालेय विद्यार्थ्यांची मानव विकासाची बस ‘सेवा बंद’

हिंगोली । जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भंडारी ते खडकी रोडवरील बोरखेडी पिनगाळे येथील पूल हा पावसाच्या पाण्याने खचून गेला आहे. त्यामुळे स्थानिकांना या रस्त्यावरुन जातांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरला ढगफुटी सदृश पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत होते या पावसाने शेती पिकांचे देखील मोठे नुकसान आहे. पावसाने बोरखेडी पिनगाळे येथील पूलाच्या साईट पट्ट्या पूर्ण पणे खचून गेल्या आहे. त्यामुळे मानव विकास ची बस सेवा बंद झाली आहे.
धोतरा बोरखेडी पिनगाळे खडकी हिवरखेडा या चार गावाच्या 40 विद्यार्थिनी गेल्या पंधरा दिवसा पासून बस येत नसल्याने शाळेत जाता येत नाही त्यामुळे या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांना देखील हिवरखेडा येथील ग्रामस्थांनी सांगितले, मात्र याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. आत्ता तात्काळ ह्या पूलावर जर मुरूम टाकला नाही तर या पूलावर येऊन या विद्यार्थीनी आंदोलन करणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घ्यावी हा रस्ता बरोबर करून द्या अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे





