Delhi Crime : दिल्ली हादरली ! संसद परिसरात व्यक्तीने स्वतःला घेतलं पेटवून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधून एक धक्कादाययक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने संसद भवनासमोर स्वतःला पेटवून घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे काही वेळ त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काय घडले नेमके?
एक व्यक्ती संसदेत पोहोचली आणि कुणाला काही समजण्यापूर्वीच त्याने स्वतःला पेटवून घेतलं. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं पाहून त्या दिशेनं धाव घेतली. पीडितेवर ब्लँकेट टाकून कसं तरी वाचवले. या घटनेत होरपळलेल्या व्यक्तीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या व्यक्तीने स्वत:ला का पेटवून घेतले हे अद्याप समजू शकलेले नाही. या व्यक्तीने आत्महत्या का केली, त्यामागे नेमके कारण काय आहे? याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. संसद भवनाच्या परिसरात अशी धक्कादायक घटना घडली कशी याचादेखील तपास पोलिसांकडून केला जात आहे.





