Hingoli Crime : हिंगोली हादरलं! मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृणपणे हत्या

हिंगोली : हिंगोलीमधून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने मित्राच्या मदतीने आपल्या सख्खा भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला तसेच त्याच्या मित्राला अटक केली आहे.
काय घडले नेमके?
हरिभाऊ किसन खोडके असं आरोपी भावाचं नाव आहे. तर शिवाजी किसन खोडके असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे. दोघंही हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके या ठिकाणचे रहिवाशी होते. आरोपी हरिभाऊ खोडके यानं आपल्या वडिलोपार्जित संपत्ती वाटा राहू नये, म्हणून आपल्या लहान भावाची हत्या केली आहे.
घटनेच्या दिवशी आरोपीनं कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलावून घेतलं होतं. भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीनं मित्र पवन आखाडे याच्या मदतीने आपल्या भावाची गळा आवळून हत्या केली. खून गेल्यानंतर आरोपी एवढयावरच थांबले नाही तर त्यांनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला. तसेच हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार दिली. प
ण २३ वर्षांचा मुलगा अशाप्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील एका खड्ड्यात पुरल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे याच्याविरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.





