Nevasa : भालगाव परिसरात नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद!
Nevasa : बिबट्या जेरबंद झाल्याचे वृत्त समजताच भालगाव - गोधेगाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

नेवासे : भालगाव -गोधेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने केलेल्या तत्पर कार्यवाहीला अखेर यश आले असून भालगाव येथील संतोष तनपुरे यांच्या सुबाभूळ पिकात लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे.
रामेश्वर शिंदे (भालगाव) यांच्या सुबाभळीच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद जेरबंद करण्यात आला. वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या प्रयत्न यशस्वी झाले.
बिबट्या जेरबंद झाल्याचे वृत्त समजताच भालगाव – गोधेगाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी व संपूर्ण रेस्क्यू टीमचे सदस्याचे भालगाव ग्रामस्थांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेमुळे परिसरात काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झाले असले तरी नागरिकांनी अद्यापही सतर्क राहावे व वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





