अल्पवयीन मुलीशी विवाह; मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल
Updated On:

पालघर : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल मुंबईतील तरूणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, निखील गोखील हा माझगाव येथील रहिवासी आहे. त्याने अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पालघरमधील विरार येथील एका युवतीशी विावाह केला. तिच्यावर फेब्रुवारी 2018 ते गेल्या वर्षी मे पर्यंत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
या मुलीची आई पोलिस हवालदार आहे. तिने याबाबतची फिर्याद भायखळा पोलिस ठाण्यात नोंदवली. ति विरार पोलिसांकडे वर्ग करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.





