Pune Crime | अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍यास अटक

गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलाला स्मशानभूमीजवळील पत्र्याचे शेडमध्ये नेऊन तेथे गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य करायला लावणार्‍यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (वय ३२, रा. डायन प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार सेव्हन लव्ह चौक पुल ते पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळील पत्र्याचे शेडमध्ये मंगळवारी सकाळी घडला. 

याप्रकरणी एका १५ वर्षाच्या मुलाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कांबळे याने या दोन मुलांना नाष्टा करण्याच्या बहाण्याने सेव्हन लव्ह चौकातून मोटार सायकलवर बसवून पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे त्यांच्यातील एकाला त्याने दारु आणण्यासाठी पाठविले. 

त्यानंतर त्याने या अल्पवयीन मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला सांगितले. या मुलाने त्याला विरोध केल्यावर त्याचा गळा दाबून केस ओढले. मी सांगतो तसे केले नाही तर तुला जिवंत मारुन टाकून स्मशानभूमीत पुरुन टाकीन, अशी धमकी दिली. 

जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबून केस ओढले व त्याला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले.

स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडणे, पोक्सो अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन रवींद्र कांबळे याला अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.