राज्यपालांऐवजी मुख्यमंत्रीच असणार सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, ममता सरकारचा निर्णय
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून तणाव होत आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने राज्यपाल यांच्याऐवजी मुख्यमंत्रीच सर्व विद्यापिठांचे कुलगुरू असतील असा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या शिक्षणमंत्र्यांनी माहिती दिली आहे की, राज्य सरकार विधानसभेत एक विधेयक आणणार आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर राज्य सरकार संचालित विद्यापीठांचे कुलगुरू यापुढे राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील.





