Mamata Banarjee On Bjp : भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पश्चिम बंगालच्या तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर भाजप प्रवेशासाठी दबाव आणला आहे, असा आरोप या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजप मध्ये सामिल व्हा नाही तर कारवाईला सामोरे जा अशी धमकी आमच्या लोकांना दिली जात आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. पुरुलिया जिल्ह्यातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना, त्यांनी हा आरोप केला. त्या म्हणाल्या की, ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयटी विभाग यासारख्या एजन्सी भाजपचे “हात” म्हणून काम करत आहेत.या यंत्रणांचा वापर टीएमसी नेत्यांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. ते माहिती न देता छापे टाकत आहेत आणि आमच्या नेत्यांच्या घरांमध्ये घुसत आहेत. | Mamata Banarjee On Bjp सर्वजण झोपेत असताना त्यांच्या घरात कोणी घुसले तर महिला काय करतील? असा सवाल त्यांनी केला.त्यांनी भूपतीनगरमध्ये शनिवारी घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला. जिथे एनआयएच्या एका पथकाने एका बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यासाठी रात्री त्यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी या पथकावर हल्ला केला होता. | Mamata Banarjee On Bjp लोकांनी कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. रामनवमीच्या पाश्र्वभूमीवर भाजप जातीय भावनांना खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने पश्चिम बंगालला मनरेगा आणि पीएम-आवास योजनांच्या निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.गरीबांसाठी घरे बांधण्यासाठी राज्य सरकार स्वताच्या खर्चातून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये देणार असल्याचे त्या म्हणाल्या.निवडणूक आयोग आता पैसे देण्याची परवानगी देणार नाही.त्यामुळे आम्ही निवडणुकीनंतर गरिबांची घरे बांधू,असे त्या म्हणाल्या. Sanjay Dutt उतरणार लोकसभेच्या रिंगणात.. ‘या’ माजी मुख्यमंत्र्याविरोधात निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण ? ना आमदार.. ना खासदार… भाजपात गेल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर सोपवली जाणार ‘ही’ सर्वात मोठी जबाबदारी ?