Mamta Kulkarni Drug Case – बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तिने अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने केली होती. तिची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने तिची गुन्हा रद्द करण्याची मागणी मान्य करताना, ‘ममता हिचा गुन्ह्यात सहभाग होता हे सिद्ध करणारे पुरावेच नाहीत,’ असे नमूद केले. तसेच, याबाबतचा तपशीलवार आदेश नंतर दिला जाणार असल्याचेही सांगितले. 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाणे येथील पोलिसांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी ममता कुलकर्णीने मुंबई उच्च न्यायालाकडे केली होती. या प्रकरणातील काही कागदपपत्रे गहाळ झाल्याने त्यावर अनेक वर्ष सुनावणी होऊ शकली नव्हती. दरम्यान, 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी 2 हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात मोठा खुलासा केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीचे नाव समोर आले होते.