Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये फेरनिवडणुका घ्या; ममता बॅनर्जी यांची मागणी
जुन्या मतदार यादीच्या आधारे म्हणजेच विशेष सघन सुधारणा (एसआयआर) पूर्वीच्या यादीच्या आधारे फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केली आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून राज्याने जुन्या मतदार यादीच्या आधारे म्हणजेच विशेष सघन सुधारणा (एसआयआर) पूर्वीच्या यादीच्या आधारे फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केली आहे.
फेसबुक लाईव्ह दरम्यान ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, भाजप आणि निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत हेराफेरी केली हे आता सिद्ध झाले आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त पदावर कायम राहतील, तोपर्यंत देशभरात आंदोलने होतील, असे त्या म्हणाल्या.
त्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे.
मुख्य निवडणूक आयुक्त पद त्यांच्यासारख्या व्यक्तीसाठी नाही. आता स्वातंत्र्यासाठीचा आणखी एक लढा लढला पाहिजे. हा लढा तडजोड करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि भाजपच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी या विषयावर चर्चा केली असून लवकरच त्यांची बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






