Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मास्टरस्ट्रोक ! केली ‘ही’ मोठी घोषणा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राज्यातील सुमारे १ कोटी बेरोजगार तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी युवा साथी योजनेची घोषणा केली असून, १० वी उत्तीर्ण बेरोजगारांना आता दरमहा १,५०० रुपये भत्ता दिला जाणार आहे.
ज्या तरुणांचे वय २१ ते ४० दरम्यान आहे आणि ज्यांनी किमान १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, ही मदत केवळ अशाच तरुणांना मिळेल जे कोणत्याही सरकारी योजनेचे लाभार्थी नाहीत (शिष्यवृत्ती सोडून). केवळ तरुणच नव्हे, तर शेतकरी आणि महिला बचत गटांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी वार्षिक ४,००० ते १०,००० रुपयांपर्यंतच्या मदतीची घोषणा त्यांनी (Mamata Banerjee) पुन्हा अधोरेखित केली. तसेच बीरभूममधील कोळसा खाण प्रकल्पामुळे आगामी १०० वर्षे राज्यात वीज कपात होणार नाही आणि १ लाख नवे रोजगार निर्माण होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.






