MALLIKARJUN KHARGE : शुद्धीकरणाचा वाद: “२४ दिवसांनंतरही एफआयआर दाखल…” ; खरगेंचे जेपी नड्डा यांना पत्र
MALLIKARJUN KHARGE : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जाहीर सभेनंतर झालेल्या शुद्धीकरण सोहळ्यावरून निर्माण झालेला वाद कायम आहे.

MALLIKARJUN KHARGE : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जाहीर सभेनंतर झालेल्या शुद्धीकरण सोहळ्यावरून निर्माण झालेला वाद कायम आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार खरगे यांनी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल न केल्याबद्दल केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. (MALLIKARJUN KHARGE)
मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी, राज्यसभा नेते जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून, हल्द्वानी याठिकाणी त्यांच्या जाहीर सभेनंतर रामलीला मैदानावर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे आणि त्यावर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले ? (MALLIKARJUN KHARGE )
या घृणास्पद घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरुद्ध २४ दिवस उलटूनही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे सांगून मल्लिकार्जुन खरगे यांनी आपला संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, “मी माझ्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, हा मुद्दा माझ्या किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांच्या वैयक्तिक सहभागाच्या पलीकडचा आहे, तर दररोज या क्रूर वास्तवाला सामोरे जाणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांशी संबंधित आहे. अशा गुन्हेगारांना धडा शिकवणे आवश्यक आहे.”
राज्यसभा में नेता सदन श्री @JPNadda को पत्र लिखकर हल्द्वानी में मेरी जनसभा के बाद रामलीला मैदान में कराए गए शुद्धीकरण (purification) के गंभीर मामले में उनके द्वारा सदन में दिए गए आश्वासन की मैंने याद दिलाई है और आग्रह किया है कि इस पर तुरंत कार्रवाई होनी चाहिए।
24 दिन बीत जाने… pic.twitter.com/QWtFACaSg6
— Mallikarjun Kharge (@kharge) September 3, 2026
जे. पी. नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, “माझी मागणी स्पष्ट आहे: या वस्तुस्थितीच्या आणि राज्यसभेत दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर, आपण उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना रामलीला मैदानातील शुद्धीकरण घटनेत सामील असलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला जाईल याची खात्री करण्याचे निर्देश द्यावेत.”
जेपी नड्डा यांचे आश्वासन (MALLIKARJUN KHARGE )
जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी म्हटले आहे, “तुम्हाला आठवत असेल की, ८ ऑगस्ट २०२६ रोजी हल्द्वानी येथील जाहीर सभेनंतर, १३ ऑगस्ट २०२६ रोजी मी अत्यंत दुःख आणि वेदनेसह राज्यसभेत अस्पृश्यतेचा मुद्दा उपस्थित केला होता.
माझ्या हस्तक्षेपानंतर, तुम्ही सभागृहात उभे राहून म्हणालात, ‘खर्गेजी जे म्हणाले आहेत ती खरोखरच एक अत्यंत दुःखद बाब आहे. हे केवळ काँग्रेस पक्षासाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठीच वेदनादायक आहे. जे काही घडले आहे त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल.'”





