MALLIKARJUN KHARGE: “धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवल्यानंतर आज संसदेत या…” ; पंतप्रधानाच्या मध्यरात्रीच्या व्हिडिओवर खरगेंचा जोरदार हल्ला
MALLIKARJUN KHARGE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार करत असलेले प्रयत्न आणि उचललेल्या पावलांची माहिती दिली.

MALLIKARJUN KHARGE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार करत असलेले प्रयत्न आणि उचललेल्या पावलांची माहिती दिली. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जलदगती न्यायालय स्थापन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या मसुद्याचीही त्यांनी माहिती दिली. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या बाबींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. (MALLIKARJUN KHARGE)
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी संसदेत भाषण करणे अपेक्षित आहे, रात्री उशिरा व्हिडिओ बनवून संसदेबाहेर एकतर्फी ‘मन की बात’ देणे अपेक्षित नाही.” असे म्हटले आहे.
जब संसद चल रही होती है तो प्रधानमंत्री को संसद के पटल पर Statement देना होता है, देर रात एक वीडियो बनाकर, संसद के बाहर एकतरफ़ा “मन की बात” नहीं करनी होती !! @narendramodi जी,
आज संसद में आने से पहले, धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त कर के आइएगा। पहले छात्रों से माफ़ी माँगिए और…
— Mallikarjun Kharge (@kharge) July 24, 2026
मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग करत लिहिले आहे की, “नरेंद्र मोदी, कृपया आज संसदेत येण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून दूर करा.” काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींकडे इतरही अनेक मागण्या केल्या आहेत. (MALLIKARJUN KHARGE)
खरगे यांनी राहुल गांधींच्या मागण्यांचा पुनरुच्चार करत म्हटले की, त्यांनी आधी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी काठ्या व पेलेट गन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
आधी विद्यार्थ्यांची माफी मागा – खरगे (MALLIKARJUN KHARGE)
मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितल्यानंतर आणि दोषींवर कठोर कारवाई केल्यानंतरच काँग्रेस सभागृहात पुढील चर्चेसाठी तयार होईल. खरगे म्हणाले की, यानंतरच ते शिक्षण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करतील.
PM Modi releases a video and says “More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet!”
Prime Minister Narendra Modi says, “… Numerous effective measures have been taken in the past two and a half months since the paper leak incident. The culprits have been… pic.twitter.com/Hw0u0ChZww
— ANI (@ANI) July 23, 2026
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, अधिकाऱ्यांनी जलदगती न्यायालयाची स्थापना आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबतचा मसुदा अंतिम करून तो त्यांना सादर केला आहे. यावर आज मंत्रिमंडळात चर्चा होईल. (MALLIKARJUN KHARGE)
मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी सल्लामसलत केल्यानंतर याला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यांनी असेही सांगितले की, हे विधेयक सभागृहात लवकरात लवकर मंजूर करण्याचे प्रयत्न केले जातील. (MALLIKARJUN KHARGE)





