मल्लिकार्जुन खरगेंच्या ‘त्या’ विधानावरुन राज्यसभेत गोंधळ ; सत्ताधाऱ्यांकडून माफीची मागणी

Mallikarjun Kharge । राज्यसभेत नवीन शिक्षण धोरण आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानावरून आज पुन्हा मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला. तसेच उपसभापतींनी त्यांना बोलण्यापासून रोखले तेव्हा खरगे म्हणाले की,” याठिकाणी हुकूमशाही सुरू आहे. यावर, जेव्हा त्यांना पुन्हा अध्यक्षांनी थांबवले तेव्हा खरगे म्हणाले की जे कोणा – कोणाला मारायचे आहे ते सांग आम्ही व्यवस्थित मारू, आम्ही सरकारला देखील चांगल्या पद्धतीने मारू असे म्हटले.
नड्डा यांनी विधानाचा निषेध केला Mallikarjun Kharge ।
राज्यसभेतील सभागृह नेते जेपी नड्डा यांनी खरगे यांच्या विधानाचा निषेध केला. तसेच, विरोधी पक्षनेत्याच्या वतीने अध्यक्षपदासाठी अशी भाषा कोणत्याही स्वरूपात स्वीकार्य नाही आणि त्यांनी त्याबद्दल माफी मागावी. त्यांनी उपसभापती हरिवंश यांच्याकडे मागणी केली की असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत. त्यांनी म्हटले की अशी भाषा अत्यंत निंदनीय आहे आणि ती क्षमेला पात्र नाही. नड्डा यांच्या विधानाच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली.
यानंतर, खरगे सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले की मी अध्यक्षांसाठी असे शब्द वापरले नाहीत. त्यांनी उपसभापतींना सांगितले की, “जर तुम्हाला माझ्या बोलण्याने दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. पण मी सरकारच्या धोरणांसाठी ‘ठोको’ हा शब्द वापरला, की आम्ही सरकारच्या धोरणांना धक्का देऊ. ते म्हणाले की मी तुमची माफी मागण्यास तयार आहे पण सरकारची माफी मागणार नाही.”
खरगेंकडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी Mallikarjun Kharge ।
खरगे पुढे म्हणाले की, “जर मंत्री धर्मेंद्र प्रधान तामिळनाडूच्या लोकांना असभ्य म्हणत असतील आणि त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. हे लोक देशाचे विभाजन करण्याबद्दल बोलतात.” यानंतर, जेपी नड्डा यांनी खरगे यांच्या माफीचे कौतुक केले पण जर त्यांनी सरकारच्या धोरणांबद्दल असेच काही म्हटले असेल तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले पाहिजे असे म्हटले.
सभागृहातील गोंधळ शांत झाल्यानंतर, काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह आणि भाजप खासदार घनश्याम तिवारी यांनी शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली. हा मुद्दा अध्यक्षांनी ठरवला आहे. काल नवीन शिक्षण धोरणावर बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी द्रमुकला असंस्कृत आणि अलोकतांत्रिक पक्ष म्हटले होते, त्यानंतर हा वाद सुरूच आहे.
हेही वाचा
“भोंग्यांवरील आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाले तर…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा




