माळेगाव – बुद्रुक येथे बुधवार (दि २६ फेब्रुवारी) सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत रुद्रयाग विधी होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता तालिका अध्यक्ष व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते नागेश्वर लिंगावर चांदीच्या मुखवट्याची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती नागेश्वर विकास प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक तावरे व उपाध्यक्ष संग्रामसिंह तावरे यांनी दिली. यावेळी बोलताना दिपक तावरे म्हणाले की, याग म्हणजे विशिष्ट देवतेला आव्हान करून त्या देवतेच्या पूजनासह इतर देवता म्हणजे उपदेवतांचे पूजनासह होम हवनात्मक कर्म करणे, हे माळेगावमधील गावकऱ्यांसाठी रुद्रयागाचे आयोजन करण्याचा उद्देश आहे. रुद्र यागात शिव ही मुख्य देवता असते. रुद्रयाग करताना त्यामध्ये सर्वप्रथम पुण्यहवाचन पूजा करून त्यामध्ये संकल्प केला जाणार आहे. या संकल्पामध्ये आपण आपली इच्छा पूर्ण होण्याचा उच्चार करतो. रुद्रयाग हा संपूर्ण गावाचे तसेच यज्ञास उपस्थित असणाऱ्या समस्त बंधू-भगिनींचे कल्याण व्हावे,तसेच आपल्या माळेगावावर कोणती आपत्ती येऊ नये, आलेल्या संकटांचे निवारण होऊन सर्वांना गावकरी, नागरीक, बालक यांना सुख -शांती लाभावी यासाठी केला जाणार आहे, तसेच मनुष्याला विविध ग्रहपिडा, ज्वरपिडा असतात. या सर्व पिडांचा, बाधांचा नाश होऊन सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी रुद्रयाग केला जाणार आहे. याशिवाय सर्वांना संततीसुख लाभून वंश वाढवा. तसेच वंशावर कोणते अरिष्ट असेल तर ते दूर व्हावे यासाठी रुद्रयाग केला जाणार आहे. असे वेगवेगळ्या ऐहिक सुखांची प्राप्ती व्हावी यासाठी रुद्र यागाचे आयोजन नागेश्वर मंदिर माळेगाव बुद्रुक केले जाणार आहे. माळेगाव बुद्रुक व परिसरातील सर्व भक्तांनी रुद्रयागावेळी उपस्थित राहून सेवा करण्याची संधी घ्यावी, असे आव्हान नागेश्वर विकास प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष दिपक तावरे व उपाध्यक्ष संग्रामसिंह तावरे व विश्वस्त मंडळाने केले. दरम्यान, महाशिवरात्री दिवशी नागेश्वर मंदिर येथे मोठा उत्सव भरतो, यासाठी भाविकांसाठी विविध सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. गुरुवार दिनांक २७ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे