Malaysia Masters 2022 : ताई त्झूसमोर सिंधू पुन्हा निष्प्रभ; आजवरच्या इतिहासात सलग…

क्वालालांपूर – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुन्हा एकदा तैपेयीच्या ताई त्झू यिंगकडून पराभवाचा सामना करावा लागला.
ताईने सिंधूचा 21-13, 12-21, 21-12 असा तीन गेममध्ये पराभव केला व उपांत्य फेरी गाठली. पहिल्या गेममध्ये ताईने जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये सिंधूने अफलातून खेळ करत गेम जिंकत बरोबरी केली. तिसऱ्या गेममध्ये सिंधूकडून वारंवार चुका होत गेल्या व तिला या गेमसह सामनाही गमवावा लागला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकणाऱ्या ताईने सिंधूचा आजवरच्या इतिहासात 17 वेळा पराभव केला आहे. ताईच्या खेळाला सिंधूकडे उत्तरच नसल्याचे चित्र याही स्पर्धेत दिसून आले. त्यापूर्वी सिंधूने ताई हिचा 2019 सालच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत पराभव केला होता. त्यानंतर सिंधूला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही.





