प्रसिद्ध मल्याळम अभिनेता बाला याला पोलिसांकडून अटक

मल्याळम चित्रपट सृष्टीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता बाला याला आज सकाळी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बालाची पूर्व पत्नी अमृता सुरेशन आणि त्यांच्या मुलीने तक्रार दाखल केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर बालाचा मॅनेजर राजेश यालाही पोलिसांनी कोची इथून अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बालावर महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याचा तसंच बाल न्याय कायद्यांशी संबंधित इतर आरोप करण्यात आले आहेत. 12 ऑक्टोबहर रोजी याप्रकरणी तीन जणांना संशयित म्हणून ओळखून गुन्हा दाखल करण्यात आला. यात बाला हा मुख्य आरोपी असून राजेश हा दुसरा आरोपी आणि फिल्म फॅक्टरीचा संस्थापक अनंतकृष्णन हा तिसरा आरोपी आहे.
बालासोबत गेल्या तीन वर्षांपासून काम करणाऱ्या त्याच्या ड्राइव्हरने त्याच्याविरोधात पुरावे दिले आहेत. अमृताला अनेकदा बाळाकडून मारहाण होताना पाहिल्याचं संबंधित ड्राइव्हरने म्हटलंय. मारहाणीच्या घटना या वारंवार घडल्याचंही त्याने म्हटलंय. इतकंच नव्हे तर मुलगी अवंतिका (12 वर्षे) आणि इतर नातेवाईकांसमोरही बालाने वारंवार अमृतावर हात उचलल्याचा खुलासा ड्राइव्हरने केला आहे.





