मलायका अरोरा पोहचली इटलीत; बोल्ड लुकने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Malaika Arora | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमूळे नेहमीच चर्चेत असते. सध्या मलायका इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
५१ वर्षीय मलायकाच्या बिकीनी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोमध्ये मलायका समुद्रकिनाऱ्यावरील एका रिसॉर्टमध्ये पोज देत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘पिंक’ लिहिले. हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ‘बेशरम’ म्हंटले आहे. काहींनी तिचे कौतुकही केले आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
एका चाहत्याने म्हटले, ‘ती दिवसेंदिवस अधिक सुंदर होत चालली आहे.’ दुसऱ्याने म्हटले, ‘एनर्जेटिक’ यापूर्वी मलायकाने मुलगा अरहानसोबत काही फोटो देखील शेअर केले होते. ती ब्रालेट घालून सायकल चालवत होती. यावरून तिला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले होते. Malaika Arora |
दरम्यान, अरहान हा मलायका आणि अरबाजचा मुलगा आहे. मलायका अरोरा बॉलिवूडची फिटनेस आयकॉन आहे. वयाच्या 51 व्या वर्षीही ती खूप सुंदर दिसते. अनेक तरुण अभिनेत्रीना ती फिटनेसच्या बाबतीत मागे टाकते. Malaika Arora |
हेही वाचा:
UPI वापरकर्त्यांसाठी होणार मोठा बदल ; आता तुम्ही सहज कर्जाची रक्कमही काढू शकणार, कसं ते वाचा





