अभिनेत्री माला पार्वती यांनी केला मोठा खुलासा; मोहनलाल यांनी AMMA संघटनेतील पद का नाकारलं ?

Mala Parvati – मल्याळम चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माला पार्वती यांनी मोहनलाल यांच्या निर्णयावर मोठं व्यक्त्यव्य केलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, मोहनलाल यांनी ‘AMMA ‘ (Association Of Malayalam Movie Artists ) या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा स्विकारण्यास नकार दिला. कारण त्यांनी याआधी संघटनेच्या कामकाजात आलेल्या अडचणींमुळे त्रस्त झाल्याची भावना व्यक्त केली होती.
मोहनलाल यांनी काही वर्ष्यांपूर्वी AMMA चं अध्यक्षपद स्विकारलं होत. परंतु यावेळी निवडणुकी आधीच त्यांनी या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. माला पार्वती यांनी एका मुलाखतीत सांगितलं की ,”मोहनलाल यांच्यावर अनेकदा चुकीच्या पद्धतीने टीका करण्यात आली होती आणि त्यांना संघटनेच्या अंतर्गत राजकारणाने खूप त्रास झाला होता”.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की ,”मोहनलाल यांच्यावर खूप अपेक्षा होत्या, पण त्यांच्या नेतृत्वात काही निर्णय घेतले गेले, ज्यावर नंतर वाद झाले. अश्या वादविवादांमुळे ते मानसिकदृष्टया त्रस्त झाले आणि त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिला.”
AMMA संघटनेची निवडणूक लवकरच होणार आहे आणि त्यात नवीन नेतृत्व येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोहनलाल यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
माला पार्वती यांच्या मते, मोहनलाल यांनी AMMA चं अध्यक्षपद पुन्हा नाकारण्यामागे संघटनेतील अंतर्गत राजकारण, चुकीच्या टीका आणि आधीच्या अनुभवातून आलेला मानसिक ताण हे मुख्य कारण आहेत.
काय आहे AMMA संघटना?
AMMA (Association of Malayalam Movie Artists) ही मल्याळम चित्रपटसृष्टीतील कलाकारांची संघटना आहे. 1994 साली कोची (केरळ) येथे स्थापन झालेली ही संघटना कलाकारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कार्य करते. यामध्ये अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ यांसह सिनेक्षेत्रातील विविध घटक सदस्य असतात. ही संघटना आर्थिक मदत, निवृत्त कलाकारांसाठी पेन्शन, वैद्यकीय व आपत्कालीन सहाय्य यांसारखी कामे करते.
दर काही वर्षांनी संघटनेच्या अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवडणूक होते. अलीकडेच अध्यक्ष मोहनलाल यांनी राजीनामा दिला, कारण एका सदस्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असूनही त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. आता 15 ऑगस्ट 2025 रोजी नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. ही संघटना केवळ सिनेक्षेत्रापुरती मर्यादित नसून समाजसेवेचाही भाग म्हणून काम करते.



