शरद पवारांनाच यूपीएचे अध्यक्ष करा, संजय राऊत म्हणाले हे काम…

नवी दिल्ली – भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. त्यामुळे भाजपला पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी दिल्लीत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अशातच यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करावे अशी पुन्हा एकदा मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावं. या भूमिकेचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. विरोधी पक्षाची एकजूट जर आपल्याला करायची असेल, बिगर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री यांना एकत्र आणायचे असेल तर हे काम शरद पवार या अगोदर नक्कीच करू शकतात. राऊतांनी याआधीही पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी केली होती.





