एकदिवसीय सामने 40 षटकांचे करा; इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने व्यक्त केले मत
Updated On:

लंडन :- टी-20 क्रिकेटच्या धोक्यामुळे एकदिवसीय सामने संपुष्टात येतील. त्यामुळे आता एकदिवसीय सामनेही 40 षटकांचेच खेळवले गेले पाहिजेत, असे इंग्लंडच्या कसोटी संघाचा अष्टपैलू खेळाडू व कर्णधार बेन स्टोक्स याने म्हटले आहे.
टी-20 सामन्यांची लीग सुरू करणे हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा व्यवसाय बनला आहे. आयपीएलच्या धर्तीवर अनेक देशांच्या लीग सुरू आहेत, तसेच नव्या लीगही सुरू होत आहेत. या सगळ्यात एकदिवसीय क्रिकेट मागे पडण्याचा धोका आहे, त्यामुळे 50 षटकांच्या जागी 40 षटकांचे सामने खेळवले जावे, असेही तो म्हणाला.




