Vitamin C Serum: सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आजकाल अनेकजण व्हिटॅमिन C सिरमचा वापर करत आहेत. त्वचेची काळजी घेण्यासाठी हे सिरम खूप लोकप्रिय झाले आहे. चेहऱ्यावरील डलनेस, पिग्मेंटेशन, टॅनिंग आणि काळे डाग कमी करण्यासाठी व्हिटॅमिन C फायदेशीर मानले जाते. मात्र, बाजारात मिळणारे अनेक सिरम महाग असतात आणि त्यामध्ये केमिकल्सचाही वापर असू शकतो. त्यामुळे आता घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन C सिरम तयार करण्याचा पर्याय अनेकजण निवडत आहेत. हे घरगुती सिरम तयार करण्यासाठी फक्त पाच गोष्टींची गरज असते आणि तेही अगदी कमी खर्चात तयार होते. योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होऊ शकते. व्हिटॅमिन C सिरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य अॅलोवेरा जेल व्हिटॅमिन E कॅप्सूल ग्लिसरीन व्हिटॅमिन C कॅप्सूल किंवा गोळ्या गुलाब पाणी सिरम बनवण्याची पद्धत सर्वप्रथम एका स्वच्छ वाटीत गुलाब पाणी आणि अॅलोवेरा जेल घ्या. हे मिश्रण चांगले फेटून एकसारखे करा. त्यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर व्हिटॅमिन C गोळ्या बारीक करून त्याची पावडर तयार करा आणि ती या मिश्रणात मिसळा. यानंतर व्हिटॅमिन E कॅप्सूल कापून त्यातील जेल मिश्रणात घाला. त्यात थोडे ग्लिसरीन टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. मिश्रण पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर ते एका स्वच्छ बाटलीत किंवा कंटेनरमध्ये भरून ठेवा. हे सिरम ५ ते ६ तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर वापरण्यास तयार होते. Homemade Vitamin C Serum सिरम वापरण्याची योग्य पद्धत रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर २ ते ३ थेंब सिरम चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा. काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि ते रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. व्हिटॅमिन C सिरमचे फायदे व्हिटॅमिन C त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यास मदत करते. वाढत्या वयानुसार त्वचेतील कोलेजन कमी होत जाते, त्यामुळे त्वचा सैल पडू लागते आणि सुरकुत्या दिसू लागतात. अशावेळी व्हिटॅमिन C सिरम त्वचेला घट्टपणा देण्यास मदत करू शकते. हे सिरम त्वचेवरील डाग, पिग्मेंटेशन आणि अनइव्हन स्किन टोन कमी करण्यासाठीही उपयुक्त मानले जाते. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासही मदत होऊ शकते. नियमित वापरामुळे त्वचेला नैसर्गिक चमक आणि तजेला मिळू शकतो. तथापि, कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. त्वचा संवेदनशील असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे ठरते.