“लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करू”; पराभवानंतर बसवराज बोम्मई यांची प्रतिक्रिया

कर्नाटक – विधानसभेच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. आता पर्यंत हअति आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसते. 12 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पक्षाने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला 66 आणि 22 जागा जेडीएसला मिळाले आहेत. त्यामुळे भाजपचा दारुण पराभव झाला आहे. याबाबत आता भाजपचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी पराभव स्वीकारला आहे. “जनतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, तरीदेखील आम्ही निवडणुकीत यश मिळवू शकलो नाही. निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आल्यावर आम्ही त्याचं तपशीलवार विश्लेषण करू. या निकालातून धडा घेत आम्ही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुनरागमन करू,” असा विश्वासही यावेळी बोम्मई यांनी व्यक्त केला.
#WATCH | We’ve not been able to make the mark. Once the results come we will do a detailed analysis. As a national party, we will not only analyse but also see what deficiencies and gaps were left at various levels. We take this result in our stride: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/uXXw26j8BO
— ANI (@ANI) May 13, 2023
दरम्यान, कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झाले होते. ज्याचा आज निकाल जाहीर झाला आहे.





