Satara | महाबळेश्वर शहरावर मकरंद पाटील यांना लक्ष द्यावे लागणार

पाचगणी, – वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील महायुतीचे विजयी उमेदवार ५४ मतांनी पिछाडीवर राहिल्याने . महाबळेश्वर शहरात महायुतीचे कार्यकर्ते मकरंद पाटील यांना आघाडी देण्यासाठी कमी पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांना यापुढे महाबळेश्वर शहराकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
शहरात महाविकास आघाडीच्या अरुणादेवी पिसाळ यांनी ३४९० मते तर महायुतीचे उमेदवार ३४३६ मते पडली. महाबळेश्वर शहराच्या विकास कामांसाठी अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. महाबळेश्वर शहरातील माजी नगरसेवक यांच्या कार्यशैलीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
महाबळेश्वर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने प्रामाणिक काम केल्यामुळे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील मकरंद पाटलांविरोधात एकदिलाने काम केल्यामुळे महाविकास आघाडीला महाबळेश्वर शहरात आघाडी घेता आली. महाबळेश्वर शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव असल्यामुळे मकरंद पाटील यांना कमी मतदान झाल्याचे दिसून आले. महाबळेश्वर शहरातील दोन माजी नगसेवकांनी मकरंद पाटील यांच्याविरोधात जंगजंग पछाडून काम करत मकरंद पाटील यांचा वारु रोखण्यात यश मिळवले.
महाबळेश्वर शहरातील विकासात योगदान देऊन शहरातील मकरंद पाटील यांच्या नगरसेवकांना मताधिक्य देण्यात आलेल अपयश बोचरे आहे. शहरात विकासकामात खो घालणा-या नगसेवकांमुळे शहरातील जनता आहे. त्यामुळे आता मकरंद पाटील यांना शहराच्या विकासात आणि राजकारणातही लक्ष घालावे लागेल, अशी चिन्हे आहेत.





