Makarand Anaspure on Ayushmann Khurrana | मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार अभिनेते मकरंद अनासपुरे यांची बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणासोबत भेट झाली. या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर करत मकरंद अनासपुरे यांनी आयुष्मानचे कौतुक केले आहे. या भेटीबद्दल त्यांनी एक खास पोस्ट लिहिली. ज्यात ते म्हणाले, “आयुष्मान भवः मला आयुष्मान खुराणाला भेटणे खूप आनंददायी होते. त्याची खरी नम्रता त्याच्या उल्लेखनीय प्रतिभेशी जुळते.” सोबतच शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्मान सूटमध्ये दिसत आहे. त्याने डोळ्यांवर गॉगल लावला आहे, तर मकरंद अनासपुरे यांनी निळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्यावर जॅकेट घातले आहे. मकरंद अनासपुरे यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. आयुष्मान खुरानाच्या कामाबद्दल बोलायचे तर विकी डोनर, ड्रिम गर्ल, अंधाधून, बाला, आर्टिकल १५ अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. नुकताच तो थामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. Makarand Anaspure on Ayushmann Khurrana | तर मकरंद अनासपुरे यांनी आजपर्यंत मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘सरकारनामा’, ‘वजूद’, ‘वास्तव: द रिअॅलिटी’, ‘सावरखेड एक गाव’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘जबरदस्त’, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. Makarand Anaspure on Ayushmann Khurrana | हेही वाचा: “ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल….”; अजित पवारांना डिवचणाऱ्या बाळराजे पाटलांना मिटकरींचे रोखठोक प्रत्युत्तर