मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल: १३ उपायुक्तांची बदली

मुंबई: मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, १३ उपायुक्त (डीसीपी) स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या आहेत. या बदलांमुळे शहराच्या सुरक्षा यंत्रणेला नवे नेतृत्व मिळणार आहे.
नव्या नियुक्त्यांनुसार, कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ ३, दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ १०, महेश धर्माजी चिमटे यांची परिमंडळ १२ आणि समीर अस्लम शेख यांची परिमंडळ ६ मध्ये नियुक्ती झाली आहे. राकेश ओला यांच्याकडे परिमंडळ ७ ची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवनाथ ढवळे यांना अंमली पदार्थ विरोधी पथक, विजयकांत मंगेश सागर यांना बंदर परिमंडळ आणि प्रशांत अशोकसिंग परदेशी यांना वाहतूक विभाग (दक्षिण) याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निमित गोयल यांची विशेष कृती दल (आ.गु.वि), दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखा १, पुरुषोत्तम नारायण कऱ्हाड यांची सायबर आणि गुन्हे शाखा, सचिन बी. गुंजाळ यांची प्रतिबंधक गुन्हे शाखा, तर राज तिलक रोशन यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या फेरबदलांमुळे गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, अंमली पदार्थ विरोधी कारवाई आणि सायबर गुन्ह्यांवरील अंकुश यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत अनुभवी अधिकाऱ्यांचे नेतृत्व मिळेल. हे बदल मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेला अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





