Gold-Silver Prices: मागणीच्या अभावामुळे आणि युद्ध निवळण्याची शक्यता वाढल्यामुळे साने व चांदीच्या घरात बरीच घट नोंदली केली. शुक्रवारी सोन्याचा दर 1,700 रुपयानी म्हणजे 1.01 टक्क्याने कमी होऊन 1 लाख 56 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दरही 5,700 रुपयांनी म्हणजे 2.2 टक्क्यांनी कोसळून 2 लाख 53 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. युद्ध संपण्याच्या शक्यतेमुळे सोने आणि चांदीची मागणी कमी झाली आहे. मात्र परिस्थिती अजूनही खात्रीने पूर्वपदावर आलेले नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता कायम आहे. हेही वाचा – भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.8 अब्ज डॉलरची वाढ; 700 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला जागतिक बाजारात सोन्याचा दर किंचित कमी होऊन 4,786 डॉलर, तर चांदीचा दर 1.12 टक्क्यांनी वाढून 79.28 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. अक्षय तृतीया जवळ आली असताना सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे भारतातील ग्राहकांना या कालावधीत सोने चांदी खरेदी करता येऊ शकेल. भारतात अक्षय तृतीयेला सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे त्या दोन धातूच्या दराकडे ग्राहकांचे बारीक लक्ष आहे.