Sonam Wangchuk : दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ; सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल
Sonam Wangchuk : पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित NEET परीक्षा फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेले पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज २१ वा दिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर परिसरात दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतल्याचेही वृत्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २१ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या सोनम वांगचूक यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या उद्देशाने दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हलवले. याबाबत अधिकृत स्तरावर सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर मंतर येथे मागच्या २० दिवसांपासून सोनम वांगचुक हे आंदोलनाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा २१ वा दिवस होता. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलस्थळी मोठा गोंधळ उडाला. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. या कार्यवाईनंतर आता विरोधकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
वजन मोठ्या प्रमाणावर घटले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मुख्य मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. यासाठी गेल्या २० दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. २० दिवसांपासून सोनम वांगचुक आपल्या उपोषणावर ठाम असून यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. तसेच वजन देखील मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यांच्या आंदोलनाला अनेकांकडून पाठिंबा मिळत असून अनेकांनी आंदोलन थांबवण्याची मागणी देखील केली आहे.
‘चलो संसद’चा नारा
वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री २० जुलै रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वांगचुक यांनी ‘चलो संसद’च्या आंदोलनाचा नारा दिला होता. या आंदोनलात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, त्याअगोदर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने देखील सरकारवर ताशेरे ओढले आहेत.





