उत्तराखंडमधील अल्मोडामध्ये मोठी दुर्घटना; बस दरीत कोसळून 23 हून अधिक जणांचा मृत्यू

Almora Bus Accident | उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये 40 हून अधिक लोक प्रवास करत होते. त्यातील 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही बस गढवालहून कुमाऊंकडे जात असताना अल्मोडा येथील मर्कुलामध्ये हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी X वर लिहिले की, ‘अल्मोडा जिल्ह्यातील मर्चुला येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील मृतांची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि SDRF टीम जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्याचे काम त्वरीत करत आहेत.’
उत्तराखण्ड के अल्मोड़ा में एक दुर्भाग्यपूर्ण सड़क हादसे में हुई जनहानि अत्यंत दुःखद है।
मेरी संवेदनाएं मृतकों के शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को सद्गति और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करने की कृपा करें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 4, 2024
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात झालेल्या अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यातील जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे ही प्रभू श्री रामाला विनंती आहे.’ दरम्यान, सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
हेही वाचा:
कॅनडात मंदिराबाहेर ‘बटोगे तो कटोगे’ची घोषणाबाजी ; हिंदूंवर लाठीचार्ज, पाठलाग करून मारहाण





