‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्रीला लग्नाच्या 35 वर्षांनंतर पतीने केलं प्रपोज

Bhagyashree Post | बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या त्या सिने इंडस्ट्रीपासून दुर असल्यातरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. सध्या भाग्यश्री आणि त्यांचे पती हिमालय यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लग्नाच्या 35 वर्षांनंतर हिमालयने पहिल्यांदाच आपल्या पत्नीला प्रपोज केले. भाग्यश्री यांची तक्रार होती की हिमालयने तिला कधीही प्रपोज केले नाही. मात्र भाग्यश्रीला तिचा पती हिमालय दसानीने अचानक ३५ वर्षांनंतर प्रपोज केल्यावर तिने आश्चर्य व्यक्त केले. हिमालय दसानीने भाग्यश्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले, ‘गुपित उलगडले आहे. हिमालयजी एक रोमँटिक पती असल्याबद्दल सर्व जण काहीही विचार करत असले तरी.. ते पूर्वी असे नव्हते आणि मी त्यांना सांगत राहिले की त्यांनी मला कधीही प्रपोज केले नाही. तर मी फोटोशूटच्या मध्यभागी होते, तेव्हा त्यांनी गाणे म्हणत मला थांबवले तेव्हा मला धक्काच बसला. पण हो, त्यांनी अखेर गुडघ्यावर बसून मला प्रपोज केले.त्याचे काही फोटो शेअर करत आहे.” Bhagyashree Post |
View this post on Instagram
भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाले, तर दोघेही शाळेत एकत्र होते. शाळेच्या शेवटच्या दिवशी हिमालय यांनी भाग्यश्री यांना प्रपोज केले होते. पण भाग्यश्री यांच्या कुटुंबाने या नात्याला स्वीकारण्यास नकार दिला. कुटुंबाच्या दबावाखाली भाग्यश्री यांनी हिमालय यांच्याशी ब्रेकअप केले. Bhagyashree Post |
त्यानंतर हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि भाग्यश्री यांनी त्यांचा पहिला चित्रपट ‘मैंने प्यार किया’ साइन केला. त्यानंतर हिमालय परत आल्यावर भाग्यश्री यांनी शेवटचा प्रयत्न करून पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते मानले नाहीत, शेवटी भाग्यश्री यांनी हिमालय यांच्यासोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा:
Sharad Pawar : “सभा गजबजतात, पण मतं मिळत नाहीत”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर थेट निशाणा





