\n

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, “महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं.”

\n
\n

माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला
\nमहाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.
\nभावपूर्ण श्रद्धांजली..! pic.twitter.com/L5huoQgpMQ

\n

— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 4, 2022

\n

\n

“अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी याच्यापासून उद्योगपतींपर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली. सिंधुताईंच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ९०० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तर केंद्र सरकारने त्यांना नुकताच मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झालाय. मी माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे,” अशी भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.

\n

नवाब मलिक (अलसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी)

\n
\n

ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाले. ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
\nआम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
\nभावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/XgLwAMvlGZ

\n

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 4, 2022

\n

\n

रुपाली चाकणकर (अध्यक्ष, राज्य महिला आयोग)

\n
\n

हजारो अनाथ लेकरांची माय पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏#Padmashri #सिंधुताई_सपकाळ #Sindhutai_Sapkal pic.twitter.com/FWUGGktWIL

\n

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 4, 2022

\n

\n

नारायण राणे (केंद्रीय मंत्री)

\n
\n

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी दु:खद आहे. अनेक अनाथ मुलांची माय झालेल्या सिंधूताईंचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सिंधूताईंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

\n

— Narayan Rane (@MeNarayanRane) January 4, 2022

\n

\n

रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी)

\n
\n

ज्येष्ठ समाजसेविका आणि हजारो अनाथ मुलांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७३) यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.🙏💐
\nत्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ff7439GGIY

\n

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 4, 2022

\n

\n

जयंत पाटील (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र)

\n
\n

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त दुखःद आहे. स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जीवन व्यतीत करणे खूप कमी जणांना शक्य होते, त्यापैकी एक सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताईंसारखी व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. pic.twitter.com/T1sXQVb118

\n

— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 4, 2022

\n

\n

धनंजय मुंडे (सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र)

\n
\n

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई! pic.twitter.com/rpNiDBDR8S

\n

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 4, 2022

\n

\n

खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

\n
\n

‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. pic.twitter.com/HmYSOTLEbG

\n

— Supriya Sule (@supriya_sule) January 4, 2022

\n

\n

विनोद तावडे (भाजपा)

\n
\n

अनाथांचीच नव्हे; तर साऱ्यांचीच ‘माई’ असणाऱ्या सिंधुताई वात्सल्याचे प्रतीक होत्या. मानवतेचा, समाजसेवेचा वसा घेतलेल्या सिंधुताईंचं कार्य समाजाला कायम दिशादर्शक ठरेल. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना विनम्र श्रद्धांजली! pic.twitter.com/JBkqgcZE5K

\n

— Vinod Tawde (@TawdeVinod) January 4, 2022

\n

\n

खासदार सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)

\n
\n

ज्येष्ठ समाजसेविका आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनाला वेदना झाल्या. सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य महिला सबलीकरण व हजारो अनाथांच्या पोषणासाठी समर्पित केले. अलिकडेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. pic.twitter.com/q38u6q8ZDD

\n

— Sunil Tatkare (@SunilTatkare) January 4, 2022

\n

\n

याशिवाय अनेक राजकीय नेते, कलाकार आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली दिली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला”; राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली सिंधुताईंना श्रद्धांजली","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/01/maay.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mai-geli-maharashtra-porka-zhala-tributes-were-paid-by-dignitaries-in-the-political-arena#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/01/maay.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mai-geli-maharashtra-porka-zhala-tributes-were-paid-by-dignitaries-in-the-political-arena#webpage","name":"“माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला”; राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली सिंधुताईंना श्रद्धांजली","url":"https://www.dainikprabhat.com/mai-geli-maharashtra-porka-zhala-tributes-were-paid-by-dignitaries-in-the-political-arena","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mai-geli-maharashtra-porka-zhala-tributes-were-paid-by-dignitaries-in-the-political-arena#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/01/maay.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mai-geli-maharashtra-porka-zhala-tributes-were-paid-by-dignitaries-in-the-political-arena#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mai-geli-maharashtra-porka-zhala-tributes-were-paid-by-dignitaries-in-the-political-arena","name":"“माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला”; राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली सिंधुताईंना श्रद्धांजली"}}]}}}

“माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला”; राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली सिंधुताईंना श्रद्धांजली