Mahindra electric car : महिंद्राच्या XEV 9e आणि BE 6 या इलेक्ट्रिक गाडीला भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत या दोन ईव्हींची सुमारे 7 टक्के हिस्सेदारी आहे. या मॉडेल्सच्या लॉन्चला एक वर्ष पूर्ण होत असल्याने महिंद्राने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे या दोन्ही ईव्हींच्या खरेदीवर 1.55 लाख रुपये बचत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. फक्त 5,000 ग्राहकांसाठीच विशेष ऑफर महिंद्राने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या गाड्यांची घोषणा केली होती, तर फेब्रुवारीमध्ये त्यांच्या किमती जाहीर झाल्या. कंपनीने आता जाहीर केलेली ही सवलत 20 डिसेंबरपर्यंत गाडी खरेदी करणाऱ्या पहिल्या 5,000 ग्राहकांसाठीच लागू असेल. कसा मिळणार 1.55 लाख रुपयांचा फायदा? महिंद्रा BE 6 आणि XEV 9e वर एकत्रित मिळणारी सवलत खालीलप्रमाणे आहे : 30,000 रुपये मूल्याच्या अॅक्सेसरीज विनामूल्य 25,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट 30,000 रुपये एक्सचेंज बोनस 7.2 kW AC फास्ट चार्जर (किंमत 50,000 रुपये) 20,000 रुपयांची मोफत सार्वजनिक चार्जिंग सुविधा या सर्व सवलती मिळून ग्राहकांना एकूण 1.55 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो. महिंद्रा BE 6 किंमत आणि रेंज : एक्स-शोरूम किंमत: 18.9 लाख रुपये ते 26.9 लाख रुपये 59 kWh बॅटरी पॅक: 556 किमी रेंज 79 kWh बॅटरी पॅक: 682 किमी रेंज या मॉडेलची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कार म्हणजे Hyundai Creta Electric. महिंद्रा XEV 9e : किंमत आणि रेंज एक्स-शोरूम किंमत: 21.9 लाख रुपये ते 30.5 लाख रुपये 59 kWh बॅटरी पॅक: 542 किमी रेंज 79 kWh बॅटरी पॅक: 656 किमी रेंज