चाकण : चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय जागांचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही बुधवार, दि.८ रोजी सकाळी ११ वाजता पार पडली. ही प्रक्रिया निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार पारदर्शकपणे पार पडली. या कार्यवाहीसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.४) श्रीमती पल्लवी सोळंके घाटगे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते. चाकण नगरपरिषद क्षेत्रासाठी एकूण १२ प्रभागांत २५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. २५ पैकी १३ जागा या महिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक प्रभागासाठी संगणकीय चिठ्ठीद्वारे आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले : १) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला) २) सर्वसाधारण (महिला), मागासवर्ग प्रवर्ग ३) सर्वसाधारण (महिला), अनुसूचित जमाती ४) सर्वसाधारण (महिला), अनुसूचित जाती ५) सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण ६) अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण ७) सर्वसाधारण (महिला), मागासवर्ग प्रवर्ग ८) मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण ९) अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण १०) सर्वसाधारण (महिला), मागासवर्ग प्रवर्ग ११) मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण १२) मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. उपजिल्हाधिकारी पल्लवी सोळंके घाटगे यांनी आभार मानले. असे आहे आरक्षण • अनुसूचित जाती : ३ जागा • अनुसूचित जमाती : १ जागा • मागासवर्ग प्रवर्ग : ७ जागा • महिलांसाठी राखीव जागा : १३ (एससी – २, ओबीसी – ४, सर्वसाधारण महिला – ७)