महिला सभापतीचा मोठेपणा, गावातील दवाखान्यासाठी 15 गुंठे जागा दिली दान

सातारा- आपण अनेक लोक वाढदिवस धुमधक्यात साजरा करतो. लाॅकडाऊन मध्येही अनेकांनी आपला वाढदिवस जोमात साजरा केला तर अनेकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महामारीशी लढणाऱ्यांना मदतसुद्धा केली. आपल्या याच दानशून वृत्तीने प्रसिद्ध असणाऱ्या आणि कायम सामाजिक बांंधिलकीची जाण असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जावळी या गावातील सभापती.
जयश्री माणिकलाल गिरी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी स्वत:च्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिगाव तालुका जावळी येथे आरोग्य उपकेंद्र सुरु केले. हेच नाही तर पशू वैद्यकिय दवाखान्याच्या इमारतीसाठी स्वमालकीची 15 गुंठे जागा महिगावच्या ग्रामपंचायतीकडे सोपवली.
सध्या कोरोनाच्या परिस्थितीत अनेक लोक आरोग्य व्यवस्थे आभावी जीव गमावत आहेत. अनेक जण अनेक स्तरांवर आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत. या सगळ्या काळात अनेकांनी मदतीचा हात देत उपासमारी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यात गावपातळीवरील समस्यांकडे दुर्लक्ष देखील झालं. मात्र जर गाव पातळीवर काम करणारं प्रशासन खंबीर असेल तर अनेक गाव सुधारी शकतात, हेच या जयश्री गिरी यांनी दाखवून दिलं.
गावात आरोग्य व्यवस्थाच नाही तर गावातील प्राथमिक व्यवसाय ज्या प्राण्यावर अवलंबून आहे. त्यांचे देखील उपाय लवकरात लवकर व्हावे यासाठी 15 गुंठे जमिन दिली, असं जयश्री गिरी म्हणतात.




